Nude Cleaning Business: 3 मुलांची आई असलेली महिला विवस्त्र राहून करते घरकाम करण्याचा नवा व्यवसाय, तासाचे घेते 'इतके' रुपये
Nude Photo (Naked cleaning (Photo Credits: Pixabay) For representational purposes only

सध्याच्या आधुनिक युगात स्वत:ला बदलण्याबरोबर नवनवीन क्लृप्त्या शोधून काढण्याच्या मागे असतात. स्वत:ला बदलत्या काळाबरोबर अपडेट करणे हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. सध्या जागतिक मंदीमुळे अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत तर जाण्याच्या मार्गावर आहेत. यात जर उच्च शिक्षित तरुणांचा निभाव लागत नाही आहे तर कमी शिकलेल्या लोकांचे काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी! म्हणूनच अमेरिकेतील 3 मुलांची आई असलेल्या महिलेने एक वेगळाच व्यवसाय सुरु केला आहे. लोकांच्या घरी घरकामाला जाणारी महिला संपूर्ण न्यूड राहून घरकाम करण्याची सेवा देते. ऐकून धक्का बसला ना, पण हे खरे हे आपल्या स्वत:च्या व्यवसायात काही हटके गोष्टी कराव्या ज्याचा आपल्याला चांगला मोबदला मिळेल या विचाराने या महिलेने ही सेवा सुरु केली आहे.

या महिलेचे नाव Claire O'Connor असून ती 35 वर्षांची आहे. तिच्या नव-याने जेव्हा तिच्या या अजब व्यवसायाबद्दल ऐकले तेव्हा त्यांना वाटले ही याबाबत गंभीर नसेल. मात्र नंतर तिचे या व्यवसायातील रुची लक्षात घेता त्यांनीही याला पसंती दर्शविली.  कपडे न घालता रेसिपी शिकवणारी 'ही' युट्युबर शेफ ठरतेय चर्चेचा विषय; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? (Watch Video)

लोकांकडे नग्न अवस्थेत घरकाम करण्याची तिने वेगवेगळी किंमत ठरविली आहे. यात पूर्ण Nude राहण्याचे तासाला £95(8830रुपये) , टॉपलेस राहण्याचे £85 आणि अंर्तवस्त्र घालून काम करण्याचे तासाला £75 अशी किंमत ठरविली आहे.

क्लेरी ने तिच्या या व्यवसायाची फेसबुक आणि अन्य सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहिरात केली आहे. त्यामुळे तिचा हा व्यवसाय खूपच व्हायरल होत आहे. हे ऐकून ब-याच लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. पण ती आपल्या मतांवर ठाम असून तिच्या या व्यवसायामध्ये तिला काहीही वावगं वाटत नाही असं ती लोकांना सांगतेय.