कपडे न घालता रेसिपी शिकवणारी 'ही' युट्युबर शेफ ठरतेय चर्चेचा विषय; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? (Watch Video)
Ruby Day (Photo Credits: Youtube)

युट्युब व्हिडिओ (Youtube Video) च्या माध्यमातून रातोरात हिट झालेली अनेक नावे आपल्या समोर आहेत. व्ह्यूज, लाईक्स, च्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत असतो. असाच काहीसा हटके प्रकार करत अमेरिकेच्या रुबी डे (Ruby Day) या महिलेने आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक स्बस्क्राइबर्स कमावले आहेत. तसं पाहायला गेलं तर रुबी च्या व्हिडिओचे विषय हे अगदी नेहमीचे असतात, योगा, कुकिंग, डान्सिंग, फिटनेस यावरील व्हिडीओज ती मुखत्वे करत असते. पण कुकिंग करताना कपडे न घालता रेसिपी शिकवण्याची तिची पद्धत व्ह्यूअर्सचे लक्ष वेधून घेत आहे. रुबी ही आपल्या कुकिंग व्हिडिओमध्ये केवळ अ‍ॅप्रेन घालून दिसून येते. सद्य घडीला रुबी डे हिच्या चॅनेलला 4,71 ,000 पेक्षा जास्त जणांनी सबस्क्राईब केले आहे तर 99 दशलक्ष म्हणजेच 990 दशलक्ष व्ह्यूज आहेत.

रुबी च्या या व्हिडिओवर अनेकदा लोकांकडून आक्षेपार्ह्य कमेंट्स केल्या जातात पण यावर आक्षेप न घेता रुबी यांची प्रतिक्रिया अगदी वेगळी ठरते. रुबीच्या मते तिचा अधिक भर हा मजेदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यावर असतो. तसेच लोकांनी स्वयंपाकाचा व्हिडिओ पाहून प्रेरणा घ्यावी असाही तिचा उद्देश आहे. Malisha Heena Khan Nude Photo: पाकिस्तानी- अफगाणी अभिनेत्री मलिशा हिना खान आणि इशिका बोहरा यांनी रबी पीरजादा हिला पाठिंबा देण्यासाठी पोस्ट केला न्यूड फोटो

पहा रूबी डे चा व्हिडीओ

कुकींगच्या व्हिडिओ शिवाय रुबी आपल्या पेजवरून विविध ड्रेसिंगचे, सेक्सशी संबंधित टिप्स देणारे, योगाचे व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. यामध्येही कमीतकमी कपडे घालून व्हिडीओ बनवण्याकडे तिचा कल असतो.