Malisha Heena Khan Nude Photo: पाकिस्तानी- अफगाणी अभिनेत्री मलिशा हिना खान आणि इशिका बोहरा यांनी रबी पीरजादा हिला पाठिंबा देण्यासाठी पोस्ट केला न्यूड फोटो
Malisha Heena Khan and Pak Singer Rabi Pirzada. (Photo Credits: Twitter|Instagram)

पाकिस्तानी- अफगाणी (Pakistani-Afghani) वंशाची मुंबईस्थित अभिनेत्री मलिशा हिना खान (Malisha Heena Khan) आणि इशिका बोहरा (Ishika Borah)  यांनी पाकिस्तानी विवादित गायिका रबी पीरजादा (Rabi Pirzada)  हिला पाठिंबा देण्यासाठी, आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्वतःचा न्यूड फोटो (Nude Photo) पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी रबी हिचे काही अश्लील व्हिडीओज आणि फोटोज सोशल मीडिया वरून लीक झाले होते. यानंतर पाकिस्तानी ट्विटर युजर्सच्या अकाउंटवरून काहीच क्षणात हे व्हिडीओ शेअर करण्यात आले. या प्रकारानंतर रबीने शोबीज इंडस्ट्रीमधून काढता पाय घेत एफआयए (तपास यंत्रणा) च्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली होती, ज्यामुळे ट्विटरने वापरकर्त्यांना अशा प्रकारचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केल्यास त्यांचे खाते ब्लॉक होऊ शकते असा इशारा दिला होता.

सध्या मलिशा हिचे ट्विटर अकाउंट (@MalishaOfficial) पाहिल्यास केवळ रबी हिला पाठिंबा देण्यासाठीच तिने हे अकाउंट तयार केल्याचेही म्हंटले जातेय,मलिशाने शेअर केलेल्या न्यूड फोटोवर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

इशिका बोहरा ट्विट

कोण आहे रबी पीरजादा?

रबी पीरजादा ही पाकिस्तान स्थित एक गायिका आहे, याआधी सुद्धा बऱ्याच वादांमधून तिचे नाव समोर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकावणे असो वा अश्लील व्हिडीओ व फोटोमधून टीका करणे असो रबी हिचे नाव मागील काही काळात सतत समोर येत होते. अशातच भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक मनीष सिंग यांनी सुद्धा आपल्या मागणी चित्रपट घैरात मध्ये तिला एक रोल ऑफर केला होता. हा सिनेमा सुद्धा सोशल मीडिया सेन्सेशन Qandeel Baloch हिच्यावर आधारित असून यातून ऑनर किलिंग हा विषय मांडण्यात आला होता.

दरम्यान, या एकूण प्रकरणानंतर ट्विटर सहित काही सोशल मीडिया साईटवर #iamrabipirzada हा हॅशटॅग देखील जोरदार ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगचा वापर करून काही जणांनी आपले पूर्ण व अर्धनग्न फोटो शेअर केले आहेत.