गिरीश महाजन (Photo Credit : Maharashtra Information Centre)

भाजपचे (BJP) आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना एका कार्यकर्त्याने शिवागाळ करुन पदाधिकाऱ्याचा वाहनांकडे दगड भिरकावल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव (Jalgaon) येथे भाजपची कोअर कमिटची बैठक आटोपल्यानंतर शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे समजत आहे. या संपूर्ण घटनेबद्दल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचे सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला नेले. या गोंधळनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, याबाबत कोणीच तक्रार न केल्याने अद्यापही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी दिली आहे.

भाजपच्या कोअर कमिटची बैठक आटोपल्यानंतर गिरिश महाजन यांनी प्रसार माध्यामाच्या प्रितिनिधीशी संपर्क साधला. त्यानंतर गिरीश महाजन भाजप कार्यालयातून निघून गेले. गिरीश महाजन हे पुन्हा कार्यालयात आले असताना एका विजय नावाच्या या कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर या कार्यकर्त्याने हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने एका कारवर दगडफेक सुद्धा केली. यासंदर्भात एक ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली आहे. परंतु, ही व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता नसून मनोरुग्ण असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Pravin Darekar Criticizes Sanjay Raut: शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नाही; संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्याला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे प्रत्युत्तर

भाजपच्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक यांच्यासह आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेनंतर गिरीश महाजन यांच्या समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.