राजकारण म्हणजे घाणेरडं क्षेत्र असं अनेकांकडून बोललं जातं मात्र या राजकारणात प्रत्यक्ष उतरून, निवडणुकीत (Election) सहभागी होऊन परिवर्तन करण्याची अनेकांची तयारी नसते. मात्र याला अपवाद ठरावी, अशी एक घटना आजच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत (Grampanchayat Election) एका गावात दिसून आले. अमेरिकेतील जॉर्जिया (Georgia) राज्यातून वैद्यकीय उच्चशिक्षण घेऊन आपल्या मायभूमीत परतलेली, यशोधरा महेंद्रसिंह शिंदे (Yashodhara Shinde) ही सांगली जिल्ह्यातील एक तरूणी आहे. सांगलीतील (Sangali) 'वड्डी'ग्रामपंचायत निवडणुकीत यशोधरा शिंदे थेट सरपंचपदी निवडून आली.
तरुण महिला सरपंच म्हणून यशोधरा शिंदेंनी (Yashodhara Shinde) ओळख मिळवली आहे. यशोधरा यांच्या यांच्या पॅनलचाही या ठिकाणी दणदणीत विजय मिळवला.सुमारे साडे चार - पाच हजार लोकसंख्येचं वड्डी नावाचं सांगली जिल्ह्यातील छोटसं गाव. हे गाव मिरज शहराच्याजवळच आहे. या निवडणुकीत यशोधरा यांनी विकासाच्या मुद्द्यावर गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार केला होता. हेही वाचा Grampanchayat Election 2022: ग्रामपंचायत निवडणुकीवर भाजपचा अजब दावा, कॉंग्रेस दिले प्रत्युत्तर
अमेरिकेतील जॉर्जियात उच्च शिक्षण घेऊन आलेली यशोधराला मतदारांनी थेट सरपंचपदी बसवले.परदेशाप्रमाणे शुद्ध पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा ग्रामीण भागापर्यंत का पोहचत नाहीत? गावकऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा का मिळत नाही? पोहोचत का नाहीत? अशा विचारातून यशोधराने निवडणुकीत सहभाग घेतला.