
Gondia Food Poisoning: गोंदिया जिल्ह्यातील (Gondia District) एका गावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका लग्न समारंभात जेवण केल्यानंतर 50 हून अधिक लोक आजारी पडले. यामध्ये अनेक मुलांचा समावेश आहे. यातील अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, बाधित लोकांवर गोरेगाव तहसीलच्या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आजारी लोकांनी शनिवारी बाबाई गावात एका लग्नात जेवण केले होते. गोरेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.के. पटले यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी गावकरी त्यांच्या मुलांसह पोटदुखी, उलट्या, जुलाब इत्यादी तक्रारी घेऊन रुग्णालयात आले होते. (हेही वाचा -Food Poisoning During Summer: उन्हाळ्यामध्ये होणारी अन्नातून विषबाधा टाळण्यासाठी खास Tips; ज्यामुळे वाढेल तुमची खाद्य सुरक्षा)
गावात वैद्यकीय शिबिराचे आयोजन -
डॉ पटले यांनीन सांगितले की, आम्ही मुलांसह सर्व रुग्णांवर उपचार केले. रविवारी चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर इतर रुग्ण निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बाबई गावात वैद्यकीय शिबिराची स्थापना केली. (हेही वाचा - Food Poisoning in Hyderabad: ग्रील्ड चिकन आणि बिर्याणी खाल्ल्याने 3 मित्रांना विषबाधा; रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल)
मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर 65 मुले आजारी -
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर होती. गुरुवारी एका शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर 65 मुले आजारी पडली. अन्नात मृत पाल आढळली होती. ही घटना जिल्ह्यातील दुर्गम भागातील कुस्मी ब्लॉकमधील गजधरपूर तुर्रीपाणी प्राथमिक शाळेत घडली. गुरुवारी दुपारी शाळेत मुलांना मध्यान्ह भोजन देण्यात आले. जेवण खाल्ल्यानंतर मुलांची तब्येत अचानक बिघडू लागली. यानंतर लगेचच मुलांना कुस्मी सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. येथे त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले आणि नंतर शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.