मुंबईला लागून असलेल्या विरार (Virar) परिसरात एकाच कुटुंबातील पाच मुलांना अन्नातून विषबाधा (Poisoning) झाली आहे. विरार फाट्याजवळ घडलेल्या या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून तिघांवर उपचार सुरू आहेत. उपचारासाठी या मुलांना नालासोपारा (Nalasopara) येथील विजय नगर पालिका रुग्णालयात (Vijay Nagar Palika Hospital) दाखल करण्यात आले आहे. तीन मुलांपैकी सात वर्षीय मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी (Mandvi Police) दोन मुलांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
अशफाक खान आणि रझिया खान हे त्यांच्या पाच मुलांसह विरार फाट्याजवळ राहतात. शुक्रवारी रात्री 10 वाजता पाच मुलांनी जेवण केले. काही तासांनंतर त्यांची एक मुलगी फरहीन हिला उलट्या होऊ लागल्या. आई रझियाने तिला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी फरहीनला मृत घोषित केले. ती घरी परतली तेव्हा आसिफ यांचाही मृत्यू झाला होता.
याशिवाय फरहाना, आरिफ आणि साहिल यांनाही उलट्या होत होत्या. या मुलांची आई रझिया हिने या तीन मुलांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मांडवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृत मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. हेही वाचा Rakesh Jhunjhunwala: शेअर मार्केटशिवाय राकेश झुनझुनवाला 'या' ठिकाणीही होते 'बिग बुल'
ही घटना विरार पूर्वेतील टोकरे ग्रामपंचायतीच्या टोके पाडा परिसरातील आहे. टोकरे ग्रामपंचायतीच्या भोयपाडा येथे हे कुटुंब राहते. घटनेची संपूर्ण माहिती अशी की, शुक्रवारी रात्री दहा वाजता संपूर्ण कुटुंबाने जेवण केले. काही तासांनंतर अचानक एका मुलीची, फरहीनची तब्येत बिघडू लागली आणि तिला उलट्या आणि जुलाब सुरू झाले. यानंतर नऊ वर्षीय बालक आसिफ आणि मुलगी फरहानाला पहाटे चार वाजता उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला.
यानंतर मुलांच्या आईने पहाटेच विरारच्या भाताणे परिसरातील प्राथमिक उपचार केंद्र गाठले. यानंतर आई रझिया मुलांना घेऊन महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. तेथे या पाच मुलांना दाखल करण्यात आले. दरम्यान, फरहीन आणि आसिफ यांचा मृत्यू झाला. उर्वरित तीन मुलांवर उपचार सुरू आहेत.