खारघर येथील रेल्वे स्थानकावर एका महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या व्यक्तीला अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

खारघर (Kharghar) येथील रेल्वे स्थानकावर (Kharghar Railway Station) प्रवासी महिलेसमोर हस्तमैथुन (masturbating) करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. पीडित महिला कामावरुन घरी जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. महिलेने स्वत: हे लाजिरवाणे कृत्य मोबाईलमध्ये टिपून स्थानिक पोलिसांकडे आरोपीची तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी वेळ न घालवता महिलेसह संबधित ठिकाणी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनवण्यात आली.

रत्नाकर तायडे असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. तायडे हा खारघर रेल्वे स्थानकाजवळील वडापावच्या गाडीवर नोकरी करत आहे. गुरुवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास पीडित महिला धात धुण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर 2 वर गेली असताना आरोपीने तिला पाहून हस्तमैथून करायला सुरुवात केली. सुरुवातीला महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, काहीवेळाने या महिलेने स्वत:च्या मोबाईलमध्ये छायाचित्र काढत आरोपीच्या विरोधात स्थानिक पोलिसात जाऊन तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. हे देखील वाचा- दिल्ली: आइस्क्रीममध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीचा रेल्वे प्रवासावेळी विनयभंग

पोलीस निरीक्षक वृक्षाली कवानपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मुळचा बुलडाणा येथील रहवासी असून अवघ्या ४ दिवसांपासून खारघर रेल्वे स्थानकाजवळील वडापावच्या गाडीवर नोकरी करत आहे. पीडित महिला प्लॅटफॉर्म नंबर 2 वर हात धुण्यासाठी गेली असताना आरोपीने तिला पाहून हस्तमैथून करायला सुरुवात केली होती. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीवर 354 अ (2) विनयभंगचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.