Delhi News: दिल्ली मेट्रो स्टेशनवर महिलेसमोर केले अश्लील चाळे, पुरुषाला घातल्या बेड्या

दिल्ली मेट्रोत नेहमी विचित्र प्रकार घडत असतात. दरम्यान दिल्ली मेट्रोत स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एका महिलेसमोर हस्तमैथुन केल्याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Delhi News: दिल्ली मेट्रो स्टेशनवर महिलेसमोर केले अश्लील चाळे, पुरुषाला घातल्या बेड्या
Metro (PC- Wikimedia Commons)

Delhi News:  दिल्ली मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एका महिलेसमोर हस्तमैथुन केल्याप्रकरणी 23 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. शिवम शर्मा असे आरोपीचे नाव असून तो एका फार्मास्युटिकल कंपनीच्या मार्केटिंग विभागात काम करतो, असे पोलिसांनी सांगितले. 7 ऑगस्ट रोजी, महिलेने मध्य दिल्लीच्या मंडी हाऊस येथे , देशातील मेट्रो स्थानकांचे व्यवस्थापन करणार्‍या सीआयएसएफशी संपर्क साधला आणि सर्व घटना सांगितली. पोलीसांना ही माहिती देताच मेट्रोच्या सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने त्याला पकडण्यात यश आले.

तिच्या तक्रारीनुसार, ती तुघलकाबाद स्टेशनपासून मंडी हाऊसपर्यंत मेट्रोमध्ये चढली, जिथे ती एका मैत्रिणीची वाट पाहत होती. समोरच्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या शर्माने तिच्यासमोर हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. ती घाबरून तेथून पळ काढला आणि मेट्रो स्थानकांवरिल व्यवस्थापन करणाऱ्या सीआयएसएफसी संपर्क साधला. पोलीसांना ही माहिती देण्यात आली आहे.

महिलेने सीआयएसएफमध्ये जाऊन संपूर्ण घटना सांगितली. मात्र शर्माला पकडण्यासाठी ते पोहोचण्यापूर्वीच तो ट्रेनमध्ये चढला आणि फरार झाला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रगती मैदान मेट्रो स्थानकात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.ही घटना मंडी हाऊस स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मेट्रो स्थानकांच्या आतील कॅमेर्‍यांचे फुटेज स्कॅन करताना पोलिसांना आढळले की आरोपी नांगलोई स्थानकावर उतरला आणि त्याला दिल्लीच्या बेगमपूर येथे शोधून काढले आणि पोलीसांनी त्याला अटक केली.

 

(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2023 07:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).