Maharashtra Assembly Winter Session 2021: प्रश्न टाळण्यासाठी पाच दिवसाच हिवाळी अधिवेशन, फड़णवीसांची सरकारवर जोरदार टीका
Devendra Fadanvis (Photo Credit - Twitter)

मुंबईत (Mumbai) होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) कार्यक्रमावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची आमची मागणी होती. परंतु, सरकारने पाच दिवसांचे तोकडे-मोकडे अधिवेशन ठेवले आहे. संसदीय कामकाजात सरकारला रस नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. विधीमंडळ संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ऐकुण कामकाजाचे दिवस पाच असुन पहिला दिवस शोक प्रस्तावत जातो त्यामुळे हे अधिवेशन फक्त चार दिवसाच आहे. येवढ्या मोठ्या पुरवणी मागण्या येणार असुन त्यावर एक दिवस चर्चा करणार आणि चर्चेनंतर ते पास करायच असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

फडणवीस पुढे म्हणतात, या सरकारची मानसिकताच नाही आहे हिवाळी अधिवेशन घेण्याची. आम्ही त्याच्यासमोर विंनती केली की अधिवेशन अजुन काही दिवस वाढवा पण सरकारला प्रश्नानाच्यां उत्तराला सामोरे जायचेच नाही आहे. सरकारला सांगितले कि 3 दिवस ब्रेक घेऊन पुन्हा अधिवेशन घ्या, अशी आम्ही विंनतीही केली. पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची मिटींग होणार आहे. त्यानंतर पुन्हा अधिवेशन कालावधी निश्चित करु असे सांगितलं आहे. 2 वर्षात एकाही अतारांकित प्रश्न, लक्षवेधीला उत्तर दिलेले नाही. याबाबत मी नाराजी व्यक्त केली आहे. प्रलंबित अतारंकित प्रश्नांना उत्तरे दिली जातील असे आश्वासन दिलं गेलं आहे. रोज प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी होईल असे आश्वासन मिळाले आहे, असंही फडणवीस म्हणाले. (हे ही वाचा 12 Rajya Sabha MP Suspended: राज्यसभेच्या 12 खासदारांच्या निलंबनामुळे शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी संतप्त, म्हणाल्या- हे कसलं असंसदीय वर्तन?.)

अधिवेशन नागपूरलाच झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. सरकार जाणीवपूर्वक अधिवेशन नागपूरला घेत नाही. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे कारण यामागे दिले जात आहेत. त्यामुळे मार्च महिन्यातील होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात (budget session in Nagpur) घ्यावे, अशी मागणी केली आहे, असे फडणवीस म्हणाले.