Crime: गाजेबो मार्केटमध्ये दुचाकीवरून आलेल्या तीन जणांकडून गोळीबार, फेरीवाल्यांना स्टॉल न लावण्याची दिली धमकी
Gun | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

वांद्रे (Bandra) पश्चिमेतील लिंकिंग रोडवर (Link Road) असलेल्या गाजेबो मार्केटमध्ये (Gazebo Market) गुरुवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी तीन राऊंड गोळीबार (firing) केला. दुचाकीस्वारांनी परिसरात स्टॉल लावणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. खार पोलिसांनी (Khar Police) घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. ही एक टॉय गन असल्याचा पोलिसांना संशय असून, एका होर्डिंगवर त्यातून सुटलेली गोळी शोधत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंकिंग रोड येथे सायंकाळी 7.45 वाजता ही घटना घडली. या गोळीबारामागे भूमाफियाचा हात असल्याचा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.

माफियांना ही जागा बळकावायची असून या ठिकाणी अवैध फेरीवाले उभे करायचे आहेत, असे त्यांना वाटते. पोलिस सूत्रांनी सांगितले की, हे तिघे काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले आणि त्यांनी हवेत दोन राऊंड गोळीबार केला. गोळीबारानंतर आरोपींनी काही फेरीवाल्यांना जागेवर स्टॉल न लावण्याची धमकी दिली. हेही वाचा  Mumbai: मुंबईतील वाहनचालकांना सीएनजी पुरवठ्यातील कमी दाबाचा फटका, अनेक सीएनजी पंप बंद

खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मोहन माने म्हणाले, गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक खरी होती की टॉय गन, याचा तपास करत आहोत. आरोपींची ओळख पटवण्यासाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहोत. बाजारात लावण्यात आलेल्या फलकावर गोळी झाडण्यात आली होती ती आम्ही शोधत आहोत.

मीडियाला संबोधित करताना डीसीपी मंजुनाथ सिंगे म्हणाले, खारमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. खार येथील लिंकिंग रोड येथे असलेल्या गॅझेबो शॉपिंग सेंटरच्या फलकावर अज्ञातांनी हवेत गोळीबार केला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. तपास सुरू आहे. आता पोलीस प्रत्येक कोनातून प्रकरणाचा तपास करत आहेत आणि या घटनेमागे कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.