Mandai Metro Station Pune | (Photo Credit - X/ANI)

पुण्यातील (Pune) मंडई मेट्रो स्थानकाला (Mandai Metro Station) काल (रविवार, 20 ऑक्टोबर) मध्यरात्री आग लागली. जी अग्निशमन दलाने (Fire Brigade Pune) तातडीने आटोक्यात आणली. मेट्रो प्रशासनाने या आगीबाबत सोमवारी (21 ऑक्टोबर) दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, स्थानकाच्या तळमजल्यावर घडलेल्या या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तसेच, कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. तळमजल्यावर असलेल्या फोमच्या साहित्याला आग लागल्याने ही घटना घडली. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत चौकशी सुरु असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.

वेल्डिंगच्या कामादरम्यान फोम सामग्रीला आग

पुणे अग्निशमन विभागाने पुष्टी करताना म्हटले की, मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास स्टेशनवर वेल्डिंगच्या कामादरम्यान फोम सामग्रीला सुरुवातीला आग लागली. जी फोमच्या साहित्यापर्यंत पसरली. ज्यामुळे आगीचा भडका उडाला. "मध्यरात्रीच्या सुमारास बांधकामाच्या कामात वापरलेले फोम पेटले, ज्यामुळे संपूर्ण स्थानकावर मोठा धूर पसरला. आमच्या चमूने अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांसह त्वरित प्रतिसाद दिला आणि पाच मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणली ", असेही अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा, Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवड भागामध्ये Kalewadi भागात गोडाऊन ला आग (Watch Video))

अग्निशमन दलाकडून स्पष्टीकरण

मेट्रो सेवेवर परिणाम नाही

स्थानिक खासदार आणि केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर परिस्थितीबाबत माहिती दिली. ज्यामध्ये म्हटले आहे की, आग तत्काळ आटोक्यात आणली आहे. ज्यामुळे धोका संपूर्ण टळला आहे. आगीच्या घटनेचा मेट्रो सेवांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. सर्व सेवा सुरळीत चालती. कोणतीही मेट्रो सेवा विस्कळीत होणार नाही. त्यांनी पुढे म्हटले की, अग्निशमन दलाने दिलेल्या तत्काळच्या प्रतिसादामुळे आगीवर नियत्रण मिळविण्यात यश आले. ज्यामुळे मोठा धोका टळला.

धोका पूर्ण टळल्याची मुरलीधर मोहोळ यांची माहिती

स्थानिकांकडून चिंता व्यक्त

दरम्यान, स्थानिकांनी मात्र घडल्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शिवाय, सध्या सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या बांधकाम उपक्रमांदरम्यान, विशेषतः मेट्रो स्थानकांसारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये, ही घटना सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये राहात असलेल्या त्रुटींकडे लक्ष वेधते, असे स्थानिकांनी म्हटले आहे. मेट्रो प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून या घटनेची चौकशी सुरु आहे.

अग्निशमन दलाने म्हटले आहे की, मंडई मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर सकाळी 12 च्या सुमारास एका फोम मटेरियलला आग लागली त्यामुळे स्टेशनमध्ये प्रचंड धूर झाला. पुणे अग्निशमन दलाने तातडीने 5 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करून पाच मिनिटांत आग आटोक्यात आणली. कोणत्याही दुखापतीची नोंद नाही. प्राथमिक माहितीनुसार स्टेशनवर वेल्डिंगचे काम सुरू असताना आग लागली.