Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

मुंबई शहरामध्ये गोरेगाव पूर्व  (Goregaon East) भागात आरे कॉलनी (Aarey colony) परिसरामध्ये जंगलात (Aarey Forest) आग लागली आहे. आज दुपारच्या सुमारास ही आग लागल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 3 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. PTI च्या रिपोर्ट्स नुसार  रॉयल पाम सोसायटी आणि  रॉयल पाम हॉटेल नजीक असलेल्या जंगलामधून ही आग पेटायला सुरूवात झाली आहे.  आरे जंगल हे मुंबई शहराचं ग्रीन लंग्स म्हणून ओळखलं जातं. प्राथमिक माहितीमध्ये या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आरेला राखीव वनक्षेत्र जंगल म्हणून घोषीत केले आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. मुंबई: आरे मिल्क कॉलनीमध्ये म्हशीच्या गोठ्यात शिरला वाट चुकलेलं बिबट्याचा बछडा; स्थानिकांनी वनात पुन्हा जायला केली मदत!

मागील काही दिवसांपासून आरेचं जंगल हे अनेक कारणांमुळे चर्चेमध्ये राहिलं आहे. या जंगला मध्ये मेट्रो चा कार डेपो व्हावा यावरून मागील सरकार मधील मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत. ठाकरे सरकार जंगल राखीव ठेवत मुंबई मेट्रोचा डेपो इतरत्र हलवण्याच्या तयारीमध्ये आहे. Aarey Forest Case: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा.

आरे कॉलनी आग

दरम्यान मागील काही दिवसांपासून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात भीषण आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये केमिकल फॅक्ट्री, गॅस सिलेंडरचे स्फोट होऊन लागलेल्या आगी यांचा समावेश होता पण आज आरे जंगलात आग लागली आहे. इथे प्राण्यांचा वावर आहे. अनेक दुर्मिळ जाती इथे आढळतात.