कल्याण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या एका मालगाडीच्या एका बोगीला आग लागल्याची घटना घडली आहे. या लागलेल्या आगीत बोगीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कल्याण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या एका बोगीला आग लागल्याची घटना घडली. आज रविवारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्यानंतर काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केलं. काही क्षणातच या बोगीला आगीच्या ज्वाळा आणि धूराने वेढलं.  या आगीमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पहायला मिळाले.  (हेही वाचा - Maharashtra Weather Update: राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, काही भागात अवकाळीसह गारपीटचा धोका)

पाहा पोस्ट -

या बोगीला आग लागल्यानंतर सुदैवाने आजूबाजूला उभ्या असलेल्या बोगीला आग लागली नाही. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि रेल्वेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवलं .दरम्यान, या आगीत बोगीचे नुकसान झालं आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या कल्याण यार्डात गर्दुल्ल्यांचा वावर असतो. या बंद बोगीत गर्दुल्ले गेले असावेत. त्यातून आग लागली असावी, अशा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे.