अकोला जिल्हा परिषद (Akola Zilla Parishad) इमारतीला सोमवारी दुपारी चार वाजणेच्या सुमारास आग लागल्याची घटना पुढे आली आहे. या आगीत सरकारी कागदपत्र जळाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसेच, बचाव आणि मदत कार्यासही सुरुवात झाली आहे.
दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आग लागल्याची माहिती कळताच परीसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तर, ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षीत ठिकाणी हालविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. (हेही वाचा, Navi Mumbai Fire: नवी मुंबईतील ऐरोली येथील रहिवासी इमारतीला आग)
आगीमध्ये कोणतीही जीवीत हानी झाल्याची माहिती नाही. तसेच, आगित नेमके काय आणि कोणत्या प्रकारचे नुकसान झाले याबाबतही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.