Posters of Mughal Emperor Aurangzeb: रॅलीत मुघल सम्राट औरंगजेबाचे पोस्टर (Mughal Emperor Aurangzeb Poster) लावणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. अहमदनगरच्या मुकुंदनगर भागात औरंगजेबाचे पोस्टर हातात घेतलेल्या एका व्यक्तीला या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अटक करण्यात आली होती.
काय आहे नेमकी प्रकरण ?
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी सकाळी 9 वाजता अहमदनगरमधील फकीरवाडा येथून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गाणी वाजवली जात होती, त्यावर लोक नाचत होते. या मिरवणुकीत चार जणांनी औरंगजेबाचे पोस्टर लावले होते. या चौघांवरही धार्मिक भावना भडकावणे, हिंसाचार भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -Shivrajyabhishek Sohala 2023: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ सरकार जारी करणार विशेष टपाल तिकीट)
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अशा घटनांना अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही. हा देश छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवणारा देश आहे, इथे कोणी औरंगजेबाचे पोस्टर दाखविल्यास कडक कारवाई केली जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कठोर कारवाई करावी. त्याच वेळी, शिवसेना (UBT) आमदार अंबादास दानवे म्हणाले, अशा प्रकरणांमध्ये सरकार केवळ मोठे दावे करते. परंतु कारवाई करण्यात अपयशी ठरते.