Puja Khedkar, Dilip Khedkar (फोटो सौजन्य - X/JaipurDialogues)

FIR Against Puja Khedkar's Father: माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील एका सार्वजनिक सेवकाला धमकावणे व अडथळा आणल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत तक्रारदाराने म्हटले आहे की, पूजा खेडकर सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर असताना दिलीप खेडकर यांनी तहसीलदार दिपक आकडे यांच्या विरोधात धमकीची भाषा वापरली होती. तसेच प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी त्यांच्या मुलीसाठी केबिन देण्यास सांगितले.

पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलीप खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकरला स्वतंत्र केबिन द्यावं, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता, असंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. (हेही वाचा -Pooja Khedkar Case: पूजा खेडकरची UPSC च्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव; IAS पद परत मिळवण्यासाठी देणार कायदेशीर लढा)

कोण आहेत दिलीप खेडकर?

सेवानिवृत्त सरकारी अधिकारी दिलीप खेडकर यांच्यावर पुण्यातील पौड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्हेगारी धमकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांची पत्नी मनोरमा हिने जमिनीच्या वादातून मुळशी परिसरातील एका व्यक्तीवर बंदूकचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली त्यांची पत्नी मनोरमा यांची न्यायालयाने नुकतीचं जामिनावर सुटका केली होती. (हेही वाचा: IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरची उमेदवारी UPSC कडून रद्द, भविष्यात परीक्षा देण्यासही मनाई)

ANI ट्विट - 

UPSC ने रद्द केली पूजा खेडकरची निवड -

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नुकतीच पूजा खेडकरची निवड रद्द केली. तसेच तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून कायमचे काढून टाकले. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2022 साठी अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्याचा आरोप पूजा खेडकरवर करण्यात आला आहे. पूजा खेडकर यांच्यावर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणादरम्यान हक्क नसलेल्या भत्त्यांची आणि सुविधांची मागणी करून अधिकार आणि विशेषाधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  (हेही वाचा:IAS Pooja Khedkar Family Absconding: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे पालक फरार, पुणे पोलिसांकडून शोध सुरू)

जिल्हा प्रशासनाकडून तक्रार मिळाल्यानंतर, आम्ही दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 186 (सार्वजनिक सेवकाच्या कामात अडथळा आणणे), 504 (हेतूपूर्वक अपमान) आणि 506 (गुन्हेगारी धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असं पुणे पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.