हिंगणघाट (Hinganghat) येथील पीडित शिक्षिकेच्या मृत्यूनंतर राज्यभरात तणावपूर्वक वातावरण निर्माण झाले असून याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी चंद्रपूर (Chandrapur) आणि नागपूर (Nagpur) येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको अंदोलनाला सुरुवात केली आहे. तसेच आरोपीला आमच्या ताब्यात त्याला आम्ही शिक्षा देतो, अशीही मागणी हिंगणघाट येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे. यासाठी ग्रामस्थांनी हैदराबादला जाणारा महामार्ग रोखून धरला आहे. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांनाही धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. या अंदोलनात पुरूषांसह अनेक महिलांचाही मोठा समावेश आहे. तसेच या अंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होऊ नये, यासाठी 300 पोलीस तैन्यात करण्यात आले आहेत.
हिंगणघाट येथील 24 वर्षीय शिक्षिका नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे तिचा पाठलाग करायचा. मात्र, 3 फेब्रुवारी रोजी पीडित शिक्षिका कामावर जात असाताना आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत पेटवून दिले होते. यात पीडिता 20 ते 30 भाजली होती. दरम्यान पीडित शिक्षेकेचा चेहरा जळाला होता. त्यामुळे तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. परंतु आज सकाळी पीडित शिक्षकेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. यानंतर हिंगणघाट जळीत कांडातील पीडित शिक्षिकेच्या मृत्यूनंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. हिंगणघाट येथील ग्रामस्थांनी तेथील चौकात आंदोलन केले आहे. तर दुसरीकडे चंद्रपूर आणि नागपूर मध्येही रास्ता रोको करण्यात आला आहे. महत्वाचे महत्वाचे म्हणजे, जो पर्यंत नागरिकांना आमच्या स्वाधीन करत नाहीत, तोपर्यंत पीडितेचा मृतदेह गावात जाऊ देणार नाही, अशी मागणी हिंगणघाट येथील ग्रामस्थ करत आहेत. हे देखील वाचा- 'हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे' भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी
आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी म्हणून खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी लढवावा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, पीडाताची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. तसेच यावर महिला प्रतिनीधी सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर, चित्रा वाघ यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणीवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे.