Thane: महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यातील कल्याण येथील पोलीस ठाण्यात एका 63 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू (Death) झाला. स्थानिक न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना शुक्रवारची असून, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिपक भिंगार्डिव या वृद्धाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पोलिसांनी एका 24 वर्षीय तरुणाला एका प्रकरणात ताब्यात घेतले होते. पोलीस त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना मागून त्याचे वडील दीपक भिंगारदिव यांनीही पोलीस ठाणे गाठले. त्याला पोलिसांनी आपल्या मुलाला कोणत्या प्रकरणात ताब्यात घेतले हे जाणून घ्यायचे होते. पोलिस उपायुक्त (झोन III-कल्याण) सचिन गुंजाळ म्हणाले, तरुणाचे वडील पोलिसांशी वाद घालत असताना त्यांना झटका आला आणि ते जागीच पडले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (हेही वाचा -Jalna: लिंगपीसाट नवरदेवाचा होणाऱ्या पत्नीवर लग्नाच्या बस्त्या दिवशीच लैंगिक अत्याचार, हत्याकरुन झाला पसार, वाचा पुढे काय घडलं)
घटना सीसीटीव्हीत कैद
पोलीस अधिकारी सचिन गुंजाळ म्हणाले, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मात्र, या प्रकरणी पोलीस ठाण्यानेच सीआयडीला या प्रकरणाचा तपास करण्याची माहिती दिली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सुनावणी करताना स्थानिक न्यायालयाने घटनेचा पंचनामा आणि शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच शवविच्छेदनाची व्हिडीओग्राफी करण्याच्या सूचनाही पोलीस ठाण्याने दिल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज ते तपास यंत्रणेकडे सोपवणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.