वय वर्षे केवळ 28, या वयात एक दोन नव्हे तर तब्बल 4 कंपन्यांचा मालक. सोबतीला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नाव कोरण्याचा विक्रम. सहाजिकच नावावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती. असे सगळे नेत्रदीपक असतानाही मुंबईचा प्रसिद्ध व्यवसायिक आणि इव्हेंट मॅनेजर पंकज कांबळे (Businessman Pankaj Kamble ) या तरुण उद्योजकाचा संशयास्पद मृत्यू (Businessman Pankaj Kamble Suspicious Death) झाला आहे. इंदोर येथील हॉटेल 'ग्लोडी पॅलस' येथील एका खोलीत पंख्याला लटकलेल्या आवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.
ज्या हॉटेल 'ग्लोडी पॅलस'मधील खोलीत पंकज कांबळे याचा मृतदेह सापडला त्या खोलीतून पोलिसांना एक डायरी मिळाली आहे. या डायरीत आय लव्ह यू निलम असे लिहिले असल्याचे समजते. या डायरीत आणखी काय आहे याबबत उत्सुकता आहे. इंदूरच्या कनाडिया पोलीस स्टेशन दप्तरी पंकज याच्या मृत्यूची नोंद झाली आहे. (हेही वाचा, VJ Chitra Death: वयाच्या 28 व्या वर्षी अभिनेत्री वीजे चित्रा हिचा मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय)
प्रसारमाध्यमांनी पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना सापडलेल्या डायरीत 'आय लव्ह यू निलम' असा लिहिले आहे. तसेच पंकज याच्या बँक खात्यावर एक कोटी रुपये असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. डायरीत सापडलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान, प्रेम, तणाव आणि नौराश्य आशा कारणातून पंकज कांबळे यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.