Marathi Writer Ratnakar Matkari Dies: जेष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. रविवारी (18 मे 2020) रात्री साडेआकरा वाजणेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ साहित्य, नाटक, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रात मतकरी यांची मुशाफीरी होती. गेल्या काही काळापासून त्यांना काहीसा थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी करण्यात आली. जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रत्नाकर मतकरी हे प्रामुख्याने नाटककार आणि गुढ कथाकार म्हणून ओळकले गेले. त्यांची 'वेडी माणसं' ही एकांकिका आकाशवाणी मुंबई केंद्रावरुन 1955 मध्ये प्रकाशित झाली. तेव्हापासून त्यांची लेखणी सुरु झाली ती पुढे अनेक वर्षे सुरुच होती.
रत्नाकर मतकरी यांची नाट्यसंपदा
रत्नाकर मतकरी यांनी अनेक नाटकं लिहिली. त्यातील ‘लोककथा 78’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘,‘आरण्यक’ या नाटकांना रसिक प्रेक्षकांनी विशेष प्रतिसाद दिला. (हेही वाचा, ज्येष्ठ साहित्यिक 'झुलवाकार' उत्तम बंडू तुपे यांचे निधन; पुणे येथे वयाच्या 78 वर्षी घेतला अखेरचा श्वास)
मतकरी यांची साहित्यसंपदा
रत्नाकर मतकरी यांची सांहित्य संपदाही मोठी आहे. त्यांनी आपल्या एकूण आयुष्यात मोठ्यांसाठी सुमारे 70 आणि मुलांसाठी 22 नाटकं लिहिली. 20 एकांकिका, 3 कादंबऱ्या, बारा लखसंग्रह लिहिले. यासोबतच ‘माझे रंगप्रयोग’हा त्यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथही बराच गाजला.
चित्रपट आणि दुरचित्रवाणी मालिका
रत्नाकर मतकरी यांच्या ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या दुरचित्रवाणी मालिका विषेश गाजल्या. त्यांनी काही चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
रोहित पवार यांचंं ट्वीट
ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी (वय ८१) यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. त्यांच्या जाण्याने बालनाट्य, प्रायोगिक नाटकं, गूढ कथालेखक असं बहुआयामी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/38KxsRdpcq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 18, 2020
जयंत पाटील यांच्याकडून श्रद्धांजली
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे आज दुःखद निधन झाले. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.#RIPRatnakarMatkari pic.twitter.com/SCprMx6zd0
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 18, 2020
रत्नाकर मतकरी यांनी गुढकथा हा विशेष लेखणप्रकार हाताळला. त्याला वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. रत्नाकर मतकरींच्या पश्चात पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक/समीक्षक रत्नाकर मतकरी, जावई डाॅ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे, असा परिवार आहे.