मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त कश्मीर सोबत करून सध्या अनेक मुंबईकरांच्या रोषाचा सामना करणारी कंगना रनौत उद्या (9 सप्टेंबरला) मुंबईमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान सोशल मीडियामध्ये अनेक युजर्सने कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर काही जण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत तिला पाठीशी घालत आहेत. अशामध्ये आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा नावाचा वापरून काही फेक अकाऊंट्स बनवली जात आहेत आणि त्याच्या माध्यमातून कंगनाला सपोर्ट करण्यासाठी काही नेटकरी मंडळी समोर आली आहेत. मात्र सोशल मीडीयावर किंवा वास्तवात देखील राज ठाकरेंनी अद्याप कंगनाच्या वक्तव्यावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. उलट मनसैनिकांनी पोलिसांत राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलं अमित आणि उर्वशी ठाकरे यांच्या नावाने खोटी प्रोफाईल बनवल्याची तक्रार दाखल यापूर्वीच दाखल केली आहे. Fact Check: राज ठाकरे यांचा कंगना रानावत हिस पाठिंबा? ट्विटर पोस्टमधील दाव्यात किती तथ्य.
मनसेच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून 5 सप्टेंबए दिवशीच ठाकरे कुटूंबीयांच्या फेक अकाऊंटबद्दल सायबर सेल कडे तक्रार केल्याची माहिती देण्यात आली होती. आता कंगनाला पाठिंबा देणारी ट्वीट्स सोशल मीडियात व्हायरल झाली आहेत.
कंगनाला सपोर्ट देणारी राज ठाकरेंच्या नावाने बनवलेली काही सोशल मीडीया हॅन्डल्स
मनसेची तक्रार
मनसे अध्यक्ष @RajThackeray , मनसे नेते श्री. अमित ठाकरे, सौ. शर्मिला राज ठाकरे, कु. उर्वशी राज ठाकरे ह्यांच्या नावाचा गैरवापर करून फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर समाजमाध्यमांमार्फत समाजात गैरसमज व खोटी माहिती पसरवणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे नोंदवण्यात यावेत. #मनसेदणका pic.twitter.com/PKWuFqzGr7
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 5, 2020
दरम्यान राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वीच डिजिटल होत ट्वीटर अकाऊंट बनवलं आहे. राज ठाकरे यांचे अधिकृत ट्वीटर अकाऊंट हे @RajThackeray असून ते ट्वीटरवर व्हेरिफाईड अकाऊंट प्रोफाईल आहे.
मनसे कडून कंगना रनौतच्या प्रकरणावर भाष्य करताना सिनेमा शाखेच्या अमेय खोपकरांनी कंगना प्रकाशझोतात राहण्यासाठी हे करत असून तिच्यावर राष्ट्रदोहाच्या खटल्याची मागणी केली आहे.