(Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महारष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिला पाठिंबा दिल्याचे एक ट्विट व्हायरल (Viral Tweet) झाले आहे. या ट्विटमध्ये कंगना रानौत हिला पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. लेटेस्टली मराठीने या ट्विटबाबत खात्री केली असता राज ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन असे कोणत्याही प्रकारचे ट्विट करण्यात आले नाही. त्यामुळे ट्विटर हँडलवरुन राज ठाकरे यांनी कंगना रनौत हिला पाठिंबा दिल्याचे जे ट्विट व्हायरल झाले आहे ते दिशाभूल करणारे असल्याचे पुढे आले.

राज ठाकरे यांच्या नावे @ThackerayOffic या ट्विटर हँडलवरुन हे ट्वट करण्यात आले आहे. लेटेस्टली मराठीने या ट्विटर हँडलची वैधता तपासली असता हे ट्विटर हँडल महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाही. भलेही हे ट्विटर हँडल आणि युजर्सचे नाव राज ठाकरे यांच्याशी साधर्म्य दाखवणारे असले तरी.

राज ठाकरे यांच्या नावे फेट ट्विट

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्य राज ठाकरे यांचे ट्विटर हँडल ट्विटरकडून अधिकृत करण्यात आले आहे. त्यांमुळे त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलसमोर ट्विटरच्या अधिकृततेची ब्लू टिकही आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलचे यूजरनेम Raj Thackeray असे असून त्यांचे ट्विटर हँडल @RajThackeray या नावाने आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या नावे कगंनाला पाठिंबा असल्याचे जे ट्विट करणयातआले आहे ते दिशाभूल करणारे आणि फेक असल्याचे दिसून येते. (हेही वाचा, Fact Check: राज ठाकरे यांनी दिला कंगना रानावत हिला पाठिंबा? ट्विटर पोस्टमधील दाव्यात किती तथ्य)

राज ठाकरे यांच्या नावे फेट ट्विट

राज ठाकरे यांच्या नावे उघडलेल्या अनधिकृत ट्विटर हँडलवरुन कंगना रनौत हिला पाठिंबा देताना संबंधीत युजरने म्हटले आहे की, येत्या 9 तारखेला हिंदू वाघीण कंगना रनौत हिचे महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे भव्य स्वागत करण्यात येईल. हिंमत असेल तर आढवून दाखवा. असे म्हणत #कंगना_रनौत आणि #संजय_राऊत असा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे.