मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) नाव सांगून गुरुग्राम येथील महिलेला (Gurugram Woman) तब्बल 20 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. गुरुग्राम पोलिसांनी घटनेची तातडीने नोंद घेत या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पाठिमागील काही काळापासून अशी अनेक प्रकरणे पुढे आली आहे. गुरुग्राम येथील महिलेसोबत घडलेल्या प्रकारामध्य अज्ञात व्यक्तीने आपण मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी केली आणि पीडितेला गंडा घातला. त्यामुळे आता सायबर गुन्हेगारांनी पोलिसांनाही सोडले नाही. गुन्हा करताना पोलिसांच्याही नावाचा बेमालून वापर हे गुन्हेगार करत असल्याचे वारंवार पुढे येऊ लागले आहे.
एनडीटीव्हीने दिलल्या वृत्तानुसार, गुरुग्राम येथील सेक्टर 43 मध्ये राहणाऱ्या एका महिलेला कुरिअर कंपनीतून 3 मार्च रोजी फोन आला. फोनवरील व्यक्तीने पीडितेला सांगितले की, आपले एक पार्सल मुंबईमध्ये आले आहे. मुंबई पोलीस रहे पार्सल जप्त करणार आहेत. मात्र, त्यासाठी काही तपशील हवा आहे. आपल्या आधार क्रमांकाची आवश्यकता आहे. समोरच्या व्यक्तीवर भरवसा ठेवत महिलेने आधार क्रमांकाची महिती दिली. हे प्रकरण इतक्यावरच थांबले नाही. सायबर चोरांनी महिलेला आणखी एक फोन केला. या वेळी त्यांनी आपण आता पोलिसांच्या गुन्हे शाखेतूनच बोलत असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर आरोपीन आपण पोलीस उपायुक्त बलसिंग राजपूत बोलत असल्याचेही सांगितले.
बलसिंग राजपूत नामक व्यक्तीने महिलेला बँकेच्या आपल्या तीन वेगवेगळ्या खात्यांतून मनी लन्ड्रींग झाल्याचे सांगितले. महिलेने आपण सांगितलेल्या कोणत्याच बँके आपले खाते नसल्याचे सांगितले. महिलेच्या उत्तारनंतर समोरील व्यक्तीने थेट धमकी देण्यास सुरुवात केली. आरोपींनी तिच्यावर दबाव टाकून टप्प्या टप्प्यांनी 20 लाख रुपये जमा करण्यास सांगितले.
फसवणूक झाल्याचे समजताच गुरुग्राम पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारचे एक प्रकरण बंगळुरु येथूनही उघडकीस आले होते. त्याही प्रकरणामध्ये आपण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतूनच बोलत असल्याची बतावणी करुन सायबर चोरड्यांनी 42 वर्षीय महिलेला 11 लाख रुपयांना गंडा घातला होता.