महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार आता मुंबईची लोकल सुरु करण्यात आली आहे. परंतु लोकल ही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे ओखळपत्र पाहून त्यांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी दिली जात आहे.(महाराष्ट्र निसर्गोद्यानात 200 बेड क्षमतेचे कोरोना आरोग्य केंद्र BMC कडून सुरू; पहा व्हिडिओ)
रेल्वे मंत्रालयाकडून 15 जून पासून रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकलने सध्या प्रवास करत आहेत. परंतु त्यांना ई-पास देण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यामध्ये विविध सरकारी आणि सहकारी बँका, बीएसएनल, एसटी महामंडळाचे कर्मचारी, पत्रकार, टपाल खाते, मुंबई पोर्ट ट्रस्ट अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा लोकलने प्रवास करण्यासाठी ई-पास देण्यात यावे असे ही अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.(Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत 'या' वयोगटातील रुग्णांचे प्रमाण अधिक, पहा संपुर्ण आकडेवारी)
मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासासाठी इ पास देण्याची खासदार अरविंद सावंत यांनी मागणी केली आहे.
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) June 20, 2020
दरम्यान,मुंबईतील रेल्वे स्थानकात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तिकिट खरेदीसाठी एक ते दोन तास मोडावे लागत आहेत. त्यात म्हणजे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा सुद्धा फज्जा उडाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर सीएसएमटी स्थानकात नागरिकांना तिकिट खरेदी करण्यासाठी रिंगण आखून देत त्यानुसार रांगेत उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास 64139 जणांना कोविड19 ची लागण झाली असून 3425 जणांचा बळी गेला आहे.