BMC's COVID Facility at Maharashtra Nature Park (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रभावाखाली सध्या संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई (Mumbai) भोवती कोविड-19 (Covid-19) चा विळखा दिवसागणित घट्ट होत आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्या लक्षात घेत मुंबई महानगरपालिकेकडून (Brihanmumbai Municipal Corporation) कोरोना आरोग्य केंद्र सुरु करण्यात येत आहेत. वाढत्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून क्वारंटाईन सेंटर, आरोग्य केंद्र यांची संख्या वाढली जात आहे. आता मुंबई महानगरपालिकेने महाराष्ट्र निसर्गोद्यानात (Maharashtra Nature Park) 200 बेड क्षमतेचे कोरोना आरोग्य केंद्र सुरु केले आहे. या आरोग्य केंद्रात ऑक्सिजन व इतर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत. (मुंबई, पुणे, ठाणे या शहरांभोवती कोरोना व्हायरसचा वाढता विळखा; तुमच्या जिल्ह्यात कोविड-19 चे किती रुग्ण? जाणून घ्या एका क्लिकवर)

या नव्या कोरोना आरोग्य केंद्रातील व्हिडिओ देखील BMC ने ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे. या व्हिडिओतून या कोरोना आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती मिळते. तसंच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणती खबरदारी घेण्यात आली आहे, हे देखील व्हिडिओत सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र निसर्गोद्यानातील कोरोना आरोग्य केंद्रात 8 डॉक्टर्स रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. रुग्णांना डेली कीटसह जेवणाची सोयही या केंद्रात करण्यात आली आहे.

BMC Tweet:

महाराष्ट्रात एकूण 124331 कोरोना बाधित रुग्ण असून त्यातील 64139 रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. 64139 पैकी 32264 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 3425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने BMC कडून सातत्याने महत्त्वपूर्ण पाऊले उचलली जात आहेत.