शिक्षणमंत्री विनोद तावडे (Photo Credits: ANI)

वैद्यकीय (Medical)-अभियांत्रिकी (Engineering) शिक्षण प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र (Cast Validity Certificate) देणे सक्तीचे नसल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी घोषणा केली आहे. त्याचसोबत अन्य व्यावसायिक अभ्यासाकरिता प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग अशा विविध मागासवर्गीय विद्यार्थ्यांना यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र दाखवणे सक्तीचे होते.

परंतु आता विनोद तावडे यांनी अभियांत्रिकी-वैद्यकिय शिक्षण प्रवेशासाठी हे प्रमाणपत्र सक्तीने नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेबाबत दिलासा मिळणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य होते. परंतु प्रवेशावेळी प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांना अडथळा येत होता.(हेही वाचा-Maharashtra Board SSC Results 2019: दहावी च्या 1400 Marksheets गायब; मंडळाने स्पष्ट केले कारण)

तसेच विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने प्रवेशाबद्दल प्रश्न उपस्थित केला जात होता. तर आता विनोद तावडे यांनी केलेल्या घोषणेनंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी प्रमाणपत्रामुळे अडथळा येणार नाही असे बोलले जात आहे.