पुण्यात (Pune) एका अभियंत्याने गळफास घेत आत्महत्या ( Engineer Commits Suicide) केली आहे. ऋषिकेश मारुती उमाप (Rishikesh Maruti Umap) असे या अभियंत्याचे नाव आहे. तो अवघ्या 29 वर्षांचा आहे. पुणे येथील कोंढवा खुर्द परिसरात त्याने आत्महत्या केली. कोरोना व्हायरस महामारीच्या काळात लॉकडाऊन घेण्यात आला होता. या लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्याने ऋषिकेश नैराश्येत होता. त्यातच त्याला पबजी गेम खेळण्याचेही व्यसन जडले होते. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
प्राप्त माहितुसार,कोंडवा परिसरात कावेरी पार्क सोसायटीत ऋषिकेश हा आपल्या आईवडीलांसोबत वास्तव्यास होता. त्याचे वडील सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. आई गृहीणी आणि भाऊ बंगळुरु येथे नोकरी करतो. सोमवारी रात्री घरातील सर्वजण नेहमीप्रमाणे झोपी गेले. ऋषिकेशही त्याच्या खोलीत झोपी गेला. मंगळवारी सकाळी घरातील सर्वजण उठले. सकाळचे 10 वाजून गेले तरीही ऋषिकेश उठलाच नाही. त्यामुळे घरातल्यांनी आवाज दिला. दरवाजा ठोठावला तरीही त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संशय आल्याने घरातल्यांनी दरवाजा तोडला आणि खोलीत प्रवेश केला. ऋषिकेश गळफास घेतलेल्या आवस्थेत मृत आढळून आला. त्यानंतर घरातल्यांनी या घटनेची माहिती कोंडाव पोलिसांना दिली. (हेही वाचा, Police Employee Commits Suicide: पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवलं जीवन)
ऋषिकेश उमप हा अभियंता आहे. त्याला नोकरीही होती. लॉकडाऊन काळात त्याची नोकरी गेली. त्यामुळे त्याच्या हाताला काम नव्हते. तो घरातच बसून होता. हाताला काम नसल्याने तो रात्र-रात्र पबजी गेम खेळत असे. अलीकडे त्याचे पबजी गेम खेळण्याचे व्यसनही वाढले होते.
कोंडावा पोलीसांनी ऋषिकेश उमप याच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.