सक्त वसुली संचालनाल (Enforcement Directorate) पथकाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपूर येथील इन्सिटट्युट ऑफ टेकनॉलॉजी (NIT) महाविद्यालयावर आज (6 ऑगस्ट) छापे टाकले. एनआयटी महाविद्लायल नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील फेटरी येथे आहे. ईडीने (ED) महाविद्यालयासोबतच अनिल देशमुख यांच्याशी संबंधीत असलेल्या इतरही काही ठिकाणी ईडीने छापे टाकल्याचे वृत्त आहे. अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार नोटीस बजावली आहे. अनेकदा नोटीस बजावूनही अनिल देशमुख उपस्थित राहताना दिसत नाहीत. अनिल देशमुख नोटीशीला दाद देत नसतानाच ईडीने आपली कारवाई सुरुच ठेवली आहे. संबंधित छाप्यांबात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आणि गाव असलेल्या काटोल मर्गावरील माऊझरी येथे ल नागपूर इन्सिटट्युट ऑफ टेकनॉलॉजी (एनआयटी) महाविद्याालय आहे. या महाविद्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. इडीने आतापर्यंत अनिल देशमुख यांच्या आणि त्यांच्याशी संबंधीत मालमत्तांवर अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. मात्र, महाविद्यालयावर धाड टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. (हेही वाचा, 'अनिल देशमुख नक्की कुठे आहेत माहित नाही, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्यास आम्ही असमर्थ आहोत'- ED)
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसा, अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत चार वेळा समन्स बजावले आहे. समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. ईडीने देशमुख यांना सोमवारी चौथ्यांदा समन्स बजावले. तरीदेखील अनिल देशमुख गैरहजरच राहिले. त्यामुळे ते नेमके आहेत तरी कोठे असा सवाल उपस्थित केला जात आहे. इडीलाही हाच प्रश्न पडला आहे. इडीने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे की, अनिल देशमुख कोठे आहेत याबाबत आम्हाला माहिती नाही. दरम्यान, ईडीच्या या उत्तरावर सर्वोच्च न्यायालय आज काय उत्तर देते याबाबत प्रतिक्षा आहे.
एएनआय ट्विट
Enforcement Directorate (ED) is conducting a search at former Maharashtra Home Minister Anil Deshmukh's (in file photo) premises in connection with a money laundering case. Search is going on at three places in Nagpur, Maharashtra: Sources pic.twitter.com/HHP0Qxjeri
— ANI (@ANI) August 6, 2021
एका बाजूला ईडीचा ससेमीरा पाठीमागे असतानाच दुसऱ्या बाजूला सीबीआयकडूनही अनिल देशमुख यांच्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारला नोटीस बजावली गेली आहे. मुंबई पोलिसांवर सीबीआयने गंभीर आरोप केले असून मुंबईच्या एसपींनी सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा दावा सीबीआयने तक्रारीत केला आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे. मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याचाही सीबीआयचा दावा आहे.