Electricity Rate Hike: सर्वसामान्यांना महावितरणाकडून शॉक! वीजबिलात मोठी वाढ होणार, तब्बल ३७ टक्के दरवाढीचा प्रस्ताव
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

दिवसेंदिवस जिवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांचे भाव तर अगदी गगनाला भिडले आहेत. त्यात इतरही रोज वापरण्यात येत असलेल्या विविध वस्तूंच्या दरात कमालीची वाढ बघायला मिळत आहे. या त्या गोष्टींतून सर्वसामान्य काटीकसरीन जगण्याचा प्रयत्न करतो आहे तोचं आता महावितरण देखील शॉक देण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे. विज ही आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाली आहे. लाईट, फॅन या केवळ प्राथमिक वस्तूचं नाही तर मोबाईल कम्प्युटर-लॅपटॉप चार्जिग, ओव्हन, गिझर, मिक्सर,एसी, टीव्ही अशा विविध वस्तू वीजेवर चालतात. किबहूना आता तर वीजेवर चालणाऱ्या गाड्या ही बाजारात उपलब्ध आहे. पण पुढील येणाऱ्या काही दिवसांत विजेचे भाव चकाकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आहे. कारण महावितरणाकडून राज्य सरकारला या संबंधीत प्रस्तावचं जारी केलेला आहे. तरी या वाढीव दराचा प्रस्ताव बघता येणाऱ्या कालावधीत वीज दर मोठ्या संख्येने वाढणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

१५०० कोटी रुपयांचा तोट सहन करणाऱ्या ‘महावितरण’ कंपनीने आगामी वीजदर आढाव्यात तब्बल ३७ टक्के दरवाढीचा प्रस्ताव कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. तसेच २०२४-२५ या दरम्यान आणखी १५ टक्के दरवाढ प्रस्तावित आहे. या प्रस्तावामुळे घरगुती, व्यावसायिक, शेतकरी अशा सर्वच श्रेणींना दरवाढीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तरी सरकार महावितरणाच्या या प्रस्तावाबाबत काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच महावितरणाच्या खासगीकरणा संबंधीत महावितरणा कडून संप पुकारण्यात आला होता पण राज्य सरकार आणि महावितरणाच्या चर्चेनंतर महावितरणाकडून हा संप मागे घेण्यात आला होता. (हे ही वाचा:- Adani इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडकडून खुल्या बाजारातून 1,500 मेगावॅट वीज खरेदी करण्यासाठी निविदा जारी)

 

घरगुती ग्राहकांचा सध्या असलेला किमान दर ३.३६ रुपये प्रतियुनिटवरून २०२३-२४साठी (एक एप्रिलपासून) ४.५० रुपये प्रतियुनिट होणार आहेत; तर सध्याचा ११.८६ रुपये प्रतियुनिट हा कमाल दर आता १६.६० रुपये प्रतियुनिट प्रस्तावित आहे. या दोन्ही श्रेणींमधील सन २०२४-२५ साठीचा वीजदर अनुक्रमे ५.१० रुपये ते १८.७० रुपये प्रतियुनिट प्रस्तावित आहे. महावितरण कंपनीने या दरवाढ याचिकेद्वारे आगामी दोन वर्षांमध्ये ६७ हजार ६४४ कोटी रुपये तूट भरपाईची मागणी केली आहे. ही सरासरी ३७ टक्के दरवाढ आहे. वीज नियामक आयोग स्थापन झाल्यापासून ही सर्वाधिक दरवाढ प्रस्तावित आहे.