Electric Motorbike Battery Explodes in Thane:  कळवा मध्ये घरात इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट; 3 जखमी
Blast | Representational image (Photo Credits: pxhere)

ठाण्यामध्ये (Thane)  इलेक्ट्रिक मोटारबाईक बॅटरीचा (Electric Motorbike Battery) स्फोट होऊन एक पुरूष आणि दोन महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. काल (19 मार्च) ला रात्री 10.30 च्या सुमारास बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घराचे छत आणि भिंत कोसळली असल्याची माहिती पालिका अधिकार्‍यांनी दिली आहे. दरम्यान स्फोट झाला तेव्हा बॅटरी चार्जिंगला होती का? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यासिन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा मध्ये शांती नगर भागात चाळीत एका घरामध्ये स्फोट झाला आहे.

28 वर्षीय तरूणीच्या घरामध्ये बॅटरी होती तर तिच्या शेजरच्या घरातील 66 वर्षीय पुरूष आणि 56 वर्षीय महिला जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलातील कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम घटनास्थळी पोहचली होती. तिन्ही जखमींना कळवा येथील शिवाजी महाराज हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नक्की वाचा: E-Bike Battery Blast in Surat: घरात चार्जिंग करताना ईव्ही बॅटरीचा स्फोट, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल .

दरम्यान स्फोटामागील कारणाचा शोध घेण्यासाठी आता तपास सुरू करण्यात आला आहे. मफतलाल कंपनी परिसरात शांतीनगर लोकवस्तीमध्ये विश्वनाथ गुप्ता वास्तव्यास असून त्यांचे वाहन दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्यांनी एका इलेक्ट्रीक दुचाकीची बॅटरी घराच्या पोटमाळ्यामध्ये ठेवली होती.