ईव्हीएम मशीन बिघडल्याची कोणाचीही तक्रार नाही, ही केवळ अफवा- निवडणूक आयोग
निवडणूक प्रशिक्षण | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात सोमवारी (Maharashtra Assembly Election 2019) मतदान पार पडले आहे. दरम्यान, सातारा (Satara) जिल्ह्यातील नवलेवाडी (Navalewadi) मतदारसंघात घोळ झाला आला असून कोणतेही बटन दाबले तरी मत कमळाच जात आहे, असा आरोप संबधित मतदाराने केला होता. यानंतर नवलेवाडी परिसरात राजकारणाने पेट घेतला होता. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या (Election Commision) कामकाजावर प्रश्न निर्माण करण्यात आले होते. परंतु, निवडणूक आयोगाने आज यावर स्पष्टीकरण देऊन अशाप्रकारच्या प्रश्नांना पूर्णविराम लावले आहे. निवडणूक आयोगाने संबधित मतदाराला मतदान केंद्राधिकाऱ्याकडे तक्रार करण्याच्या सल्ला दिला होता. परंतु, मतदान पार पडल्यानंतर कोणाचीही ईव्हीएम मशीन बिघड्याची तक्रार मिळाली नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी मतदान केंद्रात हा प्रकार घडला होता. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाला असून घड्याळ चिन्ह्याच्या समोरील बटन दाबल्यास कमळाच मत जात आहे, असा मतदान करायला आलेल्या मतदाराने दावा केला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी दिलीप वाघ आणि दीपक पवार यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. तेव्हा त्याठिकाणी उपस्थित असलेल्या निवडणूक आयोग अधिकाऱ्याने संबधित मतदाराला मतकेंद्राधिऱ्याकडे तक्रार दाखल करण्यास सांगितले होते. मात्र, मतदान प्रकिया झाल्यानंतर मत केंद्राधिकाऱ्याकडे एव्हीएम मशीन संदर्भात कोणतीच तक्रार आढळली नाही. यामुळे ही केवळ अफवा होती, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हे देखील वाचा- नंदुरबारमधील अक्कलकुवा मतदारसंघातील मणीबेली गावातल्या केवळ एका मतदारानेच केलं मतदान!

महाराष्ट्रात सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून येत्या 24 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला होता. परंतु, या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.