Anant Tare: अनंत तरे यांच्या निधनावर एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, नितीन राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील 'या' नेत्यांनी व्यक्त केला शोक
Eknath Shine, Jitendra Awhad, Nitin Raut, Rohit Pawar (Photo Credit: Facebook)

ठाणे (Thane) शहराचे माजी महापौर, माजी आमदार आणि शिवसेना उपनेते अनंत तरे (Anant Tare) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. अनंत तरे यांच्या जाण्याने सर्वत्र शोकाकूळ वातावरण निर्माण झाले आहे. यातच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shine), गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut), आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

अनंत तरे हे शिवसेनेचे फायरब्रँड नेत्यांपैकी एक होते. त्यांनी ठाणे महापालिकेचे महापौरपद भूषविले होते. एवढेच नव्हेतर, 2000 ते 2006 या दरम्यान विधानपरिषदेवर आमदार होते. तसेच कोरोना समाजाचा मोठा नेता म्हणून त्यांची ओळख होती. याशिवाय, एकविरा देवी ट्रस्टचे देखील ते अध्यक्ष होते. शिवसेनेने 2015 मध्ये त्यांची पालघर जिल्हा संपर्कप्रमुखपदी वर्णी लावली होती. हे देखील वाचा- सातारा जिल्ह्यात महामार्ग वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, तर बुलढाण्यातील 5 नगरपालिका क्षेत्रे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

एकनाथ शिंदे यांचे ट्वीट-

जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट-

नितीन राऊत यांचे ट्वीट-

रोहीत पवार यांचे ट्वीट-

आदित्य ठाकरे यांचे ट्वीट-

अनंत तरे यांच्या पश्चात्य पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सुन, नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे. अनंत तरे यांच्यावर उद्या दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.