शिवसेना नेते एकनाथ शिंदे (फोटो सौजन्य-फेसबुक)

विधानसभा निवडणूकीच्या (Assembly Election) तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. तत्पूर्वी राजकीय पक्षांकडून आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर आता शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर आता निवडणूकीपूर्वी किती आमदार भाजपात प्रवेश करणार याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षातील आमदार भविष्यात शिवसेनेत प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त केला आहे. (Maharashtra Assembly Election 2019: वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत फडकवणार स्वबळचा झेंडा? उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरु)

त्याचसोबत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे नाशिकमध्ये दौऱ्यावर आहेत. तर आदित्य यांचा दौरा कोणत्याही हेतूसाठी नाही. त्याचसोबत ते महाराष्ट्राचे उत्तम प्रकारे नेतृत्व करु शकतात असे शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच एन्काउंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेत प्रवेश करतील अशी सुद्धा चर्चा रंगत आहे.