Eknath Khadse | (Photo Credit: Facebook)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यामुळे विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Elections 2019) मध्ये माझं तिकीट कापण्यात आलं. माझं राजकारण संपवण्याचाच हा डाव आहे, असा गौप्यस्फोट भाजप (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. तिकीट वाटपावेळी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी कोअर कमेटी (BJP Core Committee) बैठकीत माझ्यबद्दल वारंवार नाराजी व्यक्त केली होती, अशी माहिती मला दिल्ली येथे मिळाली असल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिणीशी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपलं राजकारण सरळ करण्यासाठी माझं तिकीट कापले असा थेट आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांनी आजवर कोणाचेही नाव न घेता बोलत होते. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेऊन खडसे यांनी पहिल्यांदाच आरोप केला आहे.

विधानसभा निवडणुकीत कोअर कमेटीत असलेल्या नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी असते. मात्र, निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस यांच्याशिवय इतर नेत्यांना महाराष्ट्रात फारसे फिरवले नाही. इतर नेतेच काय स्वत: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे केंद्रातील ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनाही महाराष्ट्रात निवडणूक प्रचारात फारसे सक्रीय केले नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही एका मतदारसंघात अडकवून ठेवण्यात आले, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, तब्बल चार तास खलबतं केल्यावर मुहूर्त ठरला, अजीत पवार म्हणतात 'उद्या होणार मंत्रिमंडळ खातेवाटप')

जेष्ठ नेत्यांना तिकीट डावलने आणि तिकीट नाकारले तरी निवडणूक प्रचारात फारसे सक्रीय न करणे याचा भाजपला मोठा फटका बसला. तिकीट नाकारले तरी केवळ प्रचारात सक्रीय ठेवले असते तरीसुद्धा भाजपच्या 15 ते 20 जागा सहज वाढू शकल्या असत्या असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. मला तिकीट नाकरण्याचे कारण पक्षाने आतापर्यंत दिले नाही. मला तिकीट नाकारले हे ठिक आहे. किमान माझे तिकीट का कापले हे तरी, पक्षाने मला सांगायला हवे होते. माझा गुन्हा काय हेसुद्धा पक्षाने मला अद्याप सांगितले नाही, अशी खंतही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.