Eknath Khadse Likely to Join NCP: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला (BJP) सोडचिठ्ठी दिल्याचे वृत्त आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा (Eknath Khadse Resigns From BJP) दिला आहे. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यासाठी खडसे मुक्ताईनगरहून मुंबईला निघणार असल्याचे समजते. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार एकनाथ खडसे यांचा येत्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होईल, असे म्हटले आहे.
टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, एकनाथ खडसे हे मुक्ताईनगरमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेसुद्धा पत्रकार परिषदे घेऊन आज काही सुतोवाच करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताचे कार्यकर्त्यांनी खंडण केले आहे. एकनाथ खडसे यांनी राजनामा दिल्याचे वृत्त आहे. परंत, कार्यकर्त्यांपर्यंत मात्र अद्याप कोणतीही माहिती आली नाही, असे अनेक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Eknath Khadse Likely to Join NCP: जयंत पाटील यांचे रिट्वीट केलेले 'ते' ट्विट एकनाथ खडसे यांच्याकडून डिलीट; पंतप्रधान मोदी यांच्यावर होती टीका)
एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देणार हे जवळपास निश्चित झालं होतं. एकनाथ खडसे यांनी तसे स्पष्ट संकेत आज सकाळीच दिले होते. एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांचे ट्विट रिट्विट केले होते. जयंत पाटील यांचे ट्वीट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे होते. (हेही वाचा, Eknath Khadse Likely to Join NCP: ट्विट केलं रिट्विट; भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याकडून सूचक संकेत, घड्याळ काढणार 'कमळा'चा वचपा?)
दरम्यान, जयांत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!'.