कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. सर्वसामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले. ऐन दिवाळीत आगोदरच महाग झालेल्या डाळी आणि भाजपाला कमी होता की काय म्हणूण आता त्यात तेलाची भर पडली आहे.देशभरातील अनेक राज्यांमध्ये तेलबीया उत्पादनाला फटका बसला आहे. त्याचा परीणाम खाद्य तेल मोठ्या प्रमाणावर महाग (Edible Oil Price Rise) झाले आहे. प्राप्त माहितीनुसार खाद्य तेलांच्या किमतीमध्ये तब्बल 30% वाढ (Edible Oil Price rise by 30 percent) झाली आहे. ही वाढ अशीच राहिली तर सरकारसमोर आणखी एक नवे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे.
कांदा, बटाटा आणि तत्सम फळभाज्या आणि पालेभाज्या आगोदरच महागल्या आहेत. नागरिकांना खरेदी करताना अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच आता प्रामुख्याने पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. देशभरात स्वयंपाकामध्ये पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफुल तेल मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. (हेही वाचा, आहारात नक्की कोणते तेल वापरावे? जाणून घ्या तेलाचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे)
गेल्या वर्षीच्या म्हणजेच नोव्हेंबर 2019 महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर 2020 मध्ये तेल दरात प्रती लीटर मोठी वाढ झाली आहे. सध्यास्थिती तेलाचे दर 120 रुपये प्रतीलीटर इतके आहेत. गेल्या वर्षी हेच दर 80 ते 100 रुपयांच्या आसपास होते. गेल्या वर्षी 75.25 रुपये दराने विकले जाणारे वनस्पती तेल यंदा 102.5 रुपये दराने विकले जात आहे.
दरम्यान, सोयाबीन तेलाचीही अवस्था अशीच आहे. जे तेल गेल्या वर्षी 90 रुपये प्रति लीटर होते. तेच सोयाबीन तेल यंदा 110 रुपये प्रती लीटर दराने विकले जात आहे. सनफ्लॉवर तेलही गेल्या वर्षी 95 ते 110 रुपये दराने विकले जायचे तेच तेल यंदा 140 ते 150 रुपये प्रति ली दराने विकले जात आहे. शेंगदाणा तेलही 180 ते 190 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.