Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

महाविकास आघाडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना मंगळवारी सकाळी 11 वाजता ईडीने कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स धाडले आहेत. तत्पूर्वी अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक करण्याचे कथित आदेश देण्याप्रकरणी पोलिसांना फोन करत असल्याचे त्यामध्ये दिसून आले होते. भाजपने याच कारणावरुन आता त्यांच्या विरोधात कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. भाजप नेते आशीष शेलार यांनी असे म्हटले की, खेळ हा शिवसेनेने सुरु केला आहे. मात्र तो आता भाजप संपवणार आहे. याच वरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी असे म्हटले की, जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये.

कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र. (ED Notice To Anil Parab: महाराष्ट्राचे परिवहन मंत्री, शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस)

Tweet:

दरम्यान, मुंबई पोलीस दलातील माजी API सचिन वाजे यांनी NIA कोर्टाला लिहिलेल्या एका पत्रात अनिल परब यांच्यावर  50 कोटी रुपयांच्या वसूलीचा गंभीर आरोप लावला होता. त्याचसोबत महापालिकेतील 50 मोठ्या ठेकेदारांकडून 2 कोटी रुपयांच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचा सुद्धा आरोप सचिन वाजे यांनी लावला होता. परंतु हे सर्व आरोप अनिल परब यांनी फेटाळून लावले आहेत. तर आरटीओ विभागातील ट्रान्सफर पोस्टिंग प्रकरणी सुद्धा अनिल परब यांच्यावर निलंबित आरटीओ ऑफिसर गजेंद्र पाटिल यांनी ही कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप लावला आहे. याचा तपास  महाराष्ट्र डीजीपी कडून केली जात आहे.