ED Notice To Anil Parab: महाराष्ट्राचे परिवहन मंत्री, शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस
मंत्री अनिल परब | (File Photo)

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने (ED) नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना येत्या 31 ऑगस्ट रोजी ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय (Sanjay Raut) यांनी माहिती दिली आहे. अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण आणखी थिणगी पडली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमागे अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यासंदर्भातील अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिपदेखील सोशल मीडियावर व्हारयल झाली होती. त्यानंतर भाजपने अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ”शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र’.” हे देखील वाचा-  Night Curfew in Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा रात्रीची संचारबंदी? पहा काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे

संजय राऊत यांचे ट्विट-

ट्वीट-

नारायण राणे यांनी जन आशिर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी नारायण राणे आणि भाजप विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. याप्रकरणी नारायण राणे यांना अटक झाली होती. त्यांनंतर त्यांना महाड न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर नारायण राणे यांना त्याच दिवशी रात्री उशीरा जामीन मंजूर केला होता. मात्र, याचदरम्यान अनिल परब यांचा एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ज्यामध्ये अनिल परब अटकेसंदर्भात बोलताना दिसून येत आहेत. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.