रासायनिक खतांच्या खरेदी साठी पॉस मशीन (E-Pos Machine) वर शेतकर्यांना जात विचारली जात असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर विरोधकांनी या प्रकारावरून सत्ताधार्यांना धारेवर धरलं. त्यानंतर सरकारकडून त्याबाबतचा खुलासा आता समोर आला आहे. कृषी विभागाने यावर उत्तर देताना ' जात विचारण्याचा हा प्रश्न नाही तर वर्गवारी करण्यासाठी ही माहिती विचारली असल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकारने मशीन चं 3.2 सॉफ्टवेअर अपडेट केले आहे. त्यामध्ये वर्गवारी हा घटक आहे त्यासाठी ही माहिती विचारली जात आहे' . असं सांगण्यात आलं आहे.
वर्गवारी कशी केली जाते याबाबत स्पष्टीकरण देताना कृषी विभागाने प्रत्येक वर्गवारीला लाभ मिळतो आहे की नाही हे पाहण्यासाठी जनरल, एससी, एसटी, ओबीसी अशी वर्गवारी केली असल्याचं सांगण्यात आलं आहे. शेतकर्यांना त्रास होऊ नये आणि सर्वांना लाभ मिळावा हा यामागील उद्देश आहे.
विधिमंडळात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आणि सभागृहाची भावना लक्षात घेऊन याबाबत आम्ही केंद्राला कळवणार आहोत आणी त्यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नक्की वाचा: खत विकत घेताना शेतकऱ्यांना जात विचारली जाते ते योग्य नाही ही चुक दुरुस्त केली जाईल - सुधीर मुनगंटीवार .
सांगलीमध्ये पॉस मशिन वर शेतकर्यांना जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान पॉस मशीन ही यंत्रणा केंद्र शासनाच्या खत मंत्रालयामार्फत चालविली जाते. जात विचारून शेतकर्यांना अजून कोणत्या नव्या चक्रव्युहामध्ये अडकवलं तर जात नाही ना? या शंकेवरून विरोधक आज चांगलेच आक्रमक झाल्याचे समोर आले आहे.