संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दुष्यंत चौटाला यांनी व्यक्त केली नाराजी

भाजप-शिवसेना (BJP-ShivSena) यांच्यात सत्तास्थापनेवरुन पुन्हा वाद सुरु झाला आहे. यावेळी शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दुष्यंत चौटाला ( Dushyant Chautala) यांचे नाव घेत भाजपवर निशाणा साधला होता. मात्र, संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर दुष्यंत चौटाला यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांच्या तोंडात अशी वक्तव्ये शोभत नाही, असे दुष्यंत चौटाला त्यावेळी म्हणाले आहे. जागावाटप आणि सरकार स्थापनेबाबत चर्चा होताना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता, असे मोठे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर संजय राऊत यांनी दुष्यंत चौटाला यांच्या संदर्भात विधान केले होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप- शिवसेना यांच्यात युतीचा वाद पेटू लागला आहे. महाराष्ट्रात येत्या पुढील ५ वर्षात भाजपचा अडीच वर्ष तर, अडीज वर्ष शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री असणार अशी चर्चा रंगली होती. परंतु, जागावाटप आणि सरकार स्थापनेबाबत कोणताही शब्द दिला नाही, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर भाजप-शिवसेना यांच्या युतीत ठिणगी पडली आहे. यातच शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी इतरही पर्याय असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पण ते पाप आपल्या माथी नको, असेही त्यांनी सांगितल्याचे संजय राऊत म्हणाले. आम्ही सत्तेचे भुकेले नाही. आम्ही कायम सत्याचे राजकारण करीत आलो आहोत. तसेच आमच्या इथे कोणीही दुष्यंत नाही. ज्यांचे वडील तुरुंगात आहेत. आम्ही इथे धर्म आणि सत्याचेच राजकारण करतो. शरद पवारांनी भाजपविरोधात वातावरण तयार केले आणि काँग्रेस कधीच भाजपसोबत जाणार नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत. हे देखील वाचा- शिवसेना पक्षाचे संख्याबळ वाढले; बच्चू कडू, शंकरराव गडाख यांच्यासह 5 आमदारांनी दिला पाठिंबा

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दुष्यंत चौटाला यांनी नाराजी वक्त करत म्हणाले की, दुष्यंत चौताला कोण आहेत हे संजय राऊतांना माहिती आहे. गेल्या सहा वर्षांपासून माझे वडील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यावेळी त्यांनी कधी त्यांची विचारपूस केल्याचे मला माहिती नाही. त्यांच्या तोंडी अशी वक्तव्ये शोभून दिसत नाही. शिक्षक भरती गैरव्यवहारामध्ये दुष्यंत चौताला यांचे वडील अजय चौताला यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.