Monsoon 2019 | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

सध्या महाराष्ट्रातील विविध राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पुरस्थितीसुद्धा निर्माण झाल्याचे दिसून आले. त्याचसोबत काही नागरिकांना पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र ज्या राज्यात संततधार पावसामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा देता आली नाही त्यांचे पेपर पुन्हा घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी माध्यमिक शिक्षण मंडळाला निर्देश दिले आहेत.

जुलै महिन्यातील 26 आणि 27 तारखेला राज्यात पावसाचा जोर वाढलेला दिसून आला. यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याने किंवा अन्य काही कारणांमुळे विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी जाता आले नाही. यामुळे 10 वी, 12 वी यांच्यासह टंकलेखन आणि ग्रंथालयशास्त्र या विभागीत विद्यार्थ्यांना परिक्षा देता आली नाही. मात्र आशिष शेलार यांनी ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा देता आली नाही त्यांना पुन्हा एकदा पेपर देता येणार आहे.

राज्यातील पाऊस आणि अन्य आपत्कालीन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना मिळणार आहे. याबद्दल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर तातडीने निर्णय होणार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.