महाराष्ट्राच्या (Maharashtra) पुणे (Pune) येथून सर्वांना हादरून टाकरणी माहिती समोर आली आहे. वडिलोपार्जीत संपत्तीच्या वादातून सख्या मोठ्या बहिणीला जीवंत पेटवून देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती होताच चतुःश्रुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे. तर, या घटनेत गंभीर भाजलेल्या महिलेवर जवळच्या रुग्णालयात उपचार सरु आहेत. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
राजश्री मनोहर पतंगे (वय, 48) असे पीडित महिलेचे नाव आहे. राजश्री या पुण्यातील औंध परिसरातील अनुसया हौसिंग सोसायटी येथे वास्तव्यास आहेत. राजश्री राहत असलेला फ्लॅट हा त्यांच्या आईच्या नाववर आहे. परंतु, हा फ्लॅट आपल्या नावावर करून द्यावा, यासाठी राजश्री यांचा धाकटा भाऊ शरद मनोहर पतंगे शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटवर आला. त्यावेळी वडिलोपार्जित संपत्तीवरून त्यांच्यात वाद झाला. यानंतर राग अनावर झाल्याने शरदने राजश्री यांच्या साडीला आग लावून दिली. त्यावेळी राजश्री यांचा दुसरा भाऊ देखील त्या ठिकाणी होता. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. हे देखील वाचा- Mumbai: मास्क न घातल्याने दरदिवशी 10 हजार जणांच्या विरोधात कारवाई केली जात असल्याची BMC ची माहिती
या घटनेची माहिती मिळताच चतुःश्रुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शरदला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेत राजश्री यांची हनुवटी, दोन्ही गाल व मानेपासून पायापर्यंत भाग भाजला असून त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकणी सहायक पोलिस निरीक्षक संदीप पवार हे अधिक तपास करीत आहेत.