Mumbai: मास्क न घातल्याने दरदिवशी 10  हजार जणांच्या विरोधात कारवाई केली जात असल्याची BMC ची माहिती
Representational Image | (Photo Credits: IANS)

Mumbai:  नागरिकांना वारंवार सुचना देऊन सुद्धा त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अशातच आता मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात मुंबईत दररोज दिवसाला 10 हजार नागरिकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. यासाठी मुंबई महापालिकेकडून मार्शल्स हे विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.(Drugs Case in Mumbai: Special NDPS Court कडून मंत्री Nawab Malik यांचा जावई Sameer Khan,सेलिब्रिटी मॅनेजर Rahila Furniturewala, युके नागरिक Karan Sejnani यांना जामीन मंजूर)

गेल्या तीन दिवसांपूर्वीच्या आकडेवारीनुसार असे समोर आले की, दररोज 10 हजार लोकांच्या विरोधात कारवाई केली जाते. त्यामुळे 18 लाख रुपयांचा दंड दिवसाला वसूल केला जातो. मात्र काही वेळेस असे दिसून आले आहे की, मास्क न घातल्याने नागरिकांच्या विरोधात कारवाई केल्यास त्यांच्याकडून मार्शलला मारहाण किंवा शिविगाळ केल्याची प्रकरणे ही समोर आली आहेत.

गोरेगावचे नगरसेवक संदीप पटेल यांनी असे म्हटले की, महापालिकेने अनोख्या पद्धतीने नागरिकांना मास्क घालण्यासाठी सांगावे. आपल्या सर्वांना नियमांची अंमलबजावणी व्हावी असे वाटत असताना नागरिकांकडून जो दंड वसूल केला जात आहे त्याचा त्रास मात्र होऊ नये.  तर वर्सोवा येथे राहणाऱ्या एका महिलेने असे म्हटले की, जुहूच्या येथे खासगी गाड्यांमध्ये बसून सिगरेट पिणाऱ्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई केली जाते. मात्र हे काम मार्शलचे नाही आहे.(Mumbai: मुंबईत गेल्या 24 तासात 479 नव्या रुग्णांची नोंद, 5 जणांचा मृत्यू)

तर काही प्रकरणात खुप अति केले जात असल्याचे ही समोर आले आहे. एका मार्शलने व्यक्तीने मास्क घातला नाही म्हणून त्याच्याकडून चक्क 2 हजार रुपये मागितले जात असल्याचे मी पाहिले असे त्या महिले म्हटले आहे. नागरिकांना नियमांचे पालन करण्यासाठी सांगण्यास हा मार्ग नाही आहे.