CRIME | File Image

Gondia Shocker: गोंदिया जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. मालमत्तेच्या वादातून (Property Dispute) जन्मदात्या पित्याने स्वतःच्या मुलाची हत्या (Murder) केली. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तहसीलमध्ये ही गुन्हेगारीची खळबळजनक घटना समोर आली आहे. आमगाव पोलिसांनी सांगितले की, पोलीस ठाण्यापासून 5 किमी अंतरावर असलेल्या किडगीपार गावातील रहिवासी नामदेव दुर्गाजी बागडे (वय, 55) यांचा त्यांचा मुलगा रमेश नामदेव बागडे (वय, 31) याच्याशी मालमत्तेच्या वाटणीवरून बराच काळ वाद सुरू होता. 30 एप्रिलच्या रात्री वडिलांनी आपल्या मुलाची हत्या केली.

बाप-लेक दोघे मद्यधुंद -

प्राप्त माहितीनुसार, वडील आणि मुलगा दोघेही मजुरीवरून घरी परतले, तेव्हा ते दारूच्या नशेत होते. दरम्यान, वडील आणि मुलामध्ये वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीचा मुद्दा उपस्थित झाला, ज्यावरून दोघांमध्ये वाद झाला. मुलगा वडिलोपार्जित जमिनीतील वाटा देण्याची मागणी करू लाहला. तसेच दारू पिऊन वडिलांनी मुलाला शिवीगाळ केली. (हेही वाचा - Ambernath Woman Murder Case: अंबरनाथमध्ये आर्थिक वाद आणि लग्नाच्या तगाद्यामुळे संतापलेल्या तरुणाने केली 35 वर्षीय विवाहित महिलेची हत्या; आरोपीला अटक)

वडिलांनी दगडाने ठेचले मुलाचे डोके -

दरम्यान, काही वेळाने दोघांमध्ये वाद इतका वाढला की, तो हाणामारी पर्यंत पोहोचला. तथापि, वडील घरात गेले आणि त्यांनी घरातून मुसळ आणले. वडिलांनी रमेशवर मुसळाने वार केले. या हल्ल्यामुळे मुलगा खाली पडला, त्यानंतर वडिलांनी मुलाच्या डोक्यावर दगडी पाट्याने वार केला. (हेही वाचा - Bengaluru Murder Case: बेंगळुरूमध्ये भयानक हत्याकांड! पुण्यातील सॉफ्टवेअर व्यावसायिकाने पत्नीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये लपवला; आरोपीला अटक)

यानंतर, वेदनेने तडफडत रमेश रक्ताळलेल्या अवस्थेत मरण पावला. घटनेनंतर मृताची पत्नी रशिका रमेश बागडे (30) हिने पोलिसांकडे तक्रार केली. या अहवालाच्या आधारे, पोलिसांनी आरोपी नामदेव दुर्गाजी बागडे विरुद्ध आमगाव पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.