ST Bus | (Photo Credit: MSRTC)

राज्यात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ एसटी (ST Worker) कामगारांचे आंदोलन सुरू आहे. एसटी कामगारांच्या आंदोलनाचा मुद्दा जोर धरत असतानाच आता एका एसटी चालकाने दारूच्या नशेत बस चालवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोली (Hingoli) येथील कळमनुरी आगारात ही घटना घडली असुन याप्रकरणी बसचालकाविरुद्ध हिंगोली आगारात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दारुच्या नशेत एसटी चालकाने बस चालवल्यानेच खळबळजनक घटना उडाली आहे. चालकाच्या जेवणाच्या डब्या सोबत दारूच्या बाटल्याही सापडल्या. या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. या काळात एसटी चालक कामावर फिरकत नसल्याने एसटीचे स्टेअरिंग खासगी वाहनचालकांना देऊ नये, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. मात्र, अशा मागण्या करणारे एसटी कर्मचारी दारू पिऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात एका खासगी प्रवासी बसच्या चालकाला अचानक चक्कर आल्याने एका महिलेने स्टेअरिंगचा ताबा आपल्या हातात घेत चक्क चालकाला रुग्णालयात दाखल केले होते. इतर प्रवाशांनाही सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले. तर दुसरीकडे एसटी महामंडळाचे कर्मचारी ड्युटीवर असताना दारू पिऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. (हे ही वाचा महाराष्ट्र सरकार करणार Elon Musk ना मदत; मंत्री जयंत पाटील यांच्याकडून राज्यात Tesla चे युनिट उभारण्याचे निमंत्रण)

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आधीच प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी वाहतूकदारांच्या पथ्यावरच प्रवाशांचे भरपुर हाल होत आहेत. एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची लूट होत आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा परिणाम आता प्रवाशांच्या जीवनावर होत असल्याचे चित्र हिंगोलीत पाहायला मिळाले. आता बसचालकाविरुद्ध हिंगोली आगारात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता बसचालकावर कारवाई होणार का, हे पाहावे लागेल.