Mumbai: डीआरआयच्या पथकाकडून मुंबई विमानतळावर 8 किलो हेरॉईन जप्त, दोन परदेशी नागरिक अटकेत
Arrested

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पथकाला मोठे यश मिळाले आहे. डीआरआयच्या पथकाने विमानतळावर आठ किलो हेरॉईन जप्त (Heroin Seize) करून दोन परदेशी नागरिकांना अटक (Arrested) केली आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची (Drug) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 40 कोटी रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीआरआय टीमने ही कारवाई केली आहे. दोन परदेशी नागरिक कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज घेऊन मुंबईत येत असल्याची माहिती डीआरआयच्या पथकाला मिळाली होती. हे लोक मुंबई विमानतळावर उतरणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डीआरआयने सापळा रचून आरोपीला विमानतळावर पकडले. अधिकाऱ्यांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला, मात्र सामानाची तपासणी केल्यानंतर ड्रग्ज जप्त करण्यात आले. यापूर्वीही मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 21 नोव्हेंबर रोजी एनसीबीने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. हेही वाचा  Tanaji Sawant On Measles Outbreak: गोवरचा उद्रेक बघता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे प्रतिबंधात्मक महत्वपूर्ण आदेश

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने मुंबईतून कोट्यवधी रुपयांच्या कोकेनसह दोन परदेशी नागरिकांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकांमध्ये दक्षिण आफ्रिकेतील रहिवासी असलेल्या मरिंडा एस या महिलेचा समावेश आहे. महिलेकडून 2.800 किलो चांगल्या दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले. जे वेगवेगळ्या आकाराच्या 8 पॅकेटमध्ये लपवले होते.

याआधी 7 नोव्हेंबरला सीबीआयने मुंबई विमानतळावरच एका परदेशी नागरिकांना ड्रग्जसह अटक केली होती. आरोपी पोलंडचा नागरिक होता. आरोपींकडून सहा किलो हेरॉईन सापडले असून त्याची अंदाजे किंमत 18 कोटी रुपये आहे. अंमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अंडरगारमेंटमध्ये ड्रग लपवले होते.