महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samit) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात (Dr. Narendra Dabholkar Murder Case) न्यायालयात आज (मंगळवार, 7 नोव्हेंबर) 5 आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्येला आठ वर्षे होत आली तरी अद्यापही या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले नव्हते. डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत. प्रकरणाचे सूत्रधार फरार आहेत. त्यामुळे या प्रकरणात ज्यांना अटक झाली आहे त्यांच्यावर त्यांच्यावर दाखल होणारे आरोपपत्र हे हे डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात डॉ. विरेंद्र तावडे, सचिन अंडुरे, शरद कळसकर, अॅड. पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात हत्येचा कट करणे, हत्या करणे तसेच बेकायदा हालचाल प्रतिबंध कायद्यान्वये (UAPA)डॉ. तावडे, सचिन अंडुरे, शरद कळसकर यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. तर पुरावे नष्ट केल्याचा आरोप अॅड. पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. (हेही वाचा, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपी विक्रम भावे विरूद्ध चार्जशीट दाखल करण्यासाठी CBI ला पुणे सत्र न्यायालयाकडून 90 दिवसांची मुदतवाढ)
विशेष न्यायाधीष एस आर नावंदर यांच्या न्यायालयात डॉ. तावडे, सचिन अंडुरे, शरद कळसकर, अॅड. पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्चिती करण्यात येईल. विशेष न्यायाधीष एस आर नावंदर यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार आहे.
दरम्यान, डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील पाच आरोपींपैकी डॉ. तावडे, सचिन अंडुरे, शरद कळसकर हे तिघे कारागृहात आहेत. तर अॅड. पुनाळेकर आणि विक्रम भावे हे उर्वरीत दोघे जामीनावर बाहेर आहेत. सीबीआयचे सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयात खटल्याची पार्श्वभूमी सांगितली आणि आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात यावी असे म्हटले. दरम्यान, बाचाव पक्षाद्वारे तपास यंत्रणेच्या तपासावरच आक्षेप घेण्यात आला. अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर हे बचाव पक्षाची बाजू न्यायालयात मांड आहेत. त्यांनी सीबीआयच्या दोषारोपपत्रात अनेक विसंगती असल्याचे म्हटले आहे.