अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शनिवारी मुंबईतून संजीव पुनाळेकर (Sanjiv Punalekar) आणि विक्रम भावे (Vikram Bhave) यांना अटक करण्यात आली होती. तर आज पुणे सत्र न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
संजीव पुनाळेकर हा विविध गुन्ह्याच्या प्रकरणी वकील म्हणून काम करतो. तसेच दाभोळकर हत्येप्रकरणीसुद्धा पुनाळेकर हा वकील म्हणून काम करत होता. तर विक्रम भावे याला ठाण्यातील गडकरी रंगायतन बॉम्ब स्फोट प्रकरणी अटक करण्यात आली होती. तर आता यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली असता या दोघांची नावे समोर आली आहेत.
दाभोळकर हत्येप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करणे असा आरोप पुनाळेकर याच्यावर आहे. तर भावे याच्यावर दाभोळकर याने आरोपींना त्यांची ओळख करुन देणे, घटनास्थळाची रेकी करणे असे आरोप लावण्यात आले आहे. या दोघांची नावे शरद कळसकर याच्या जबाबानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.(नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी विक्रम भावे, संजय पुनाळेकर यांना मुंबईतून अटक)
नरेंद्र दाभोळकर यांची हत्या 2013 मध्ये पुण्यात सकाळीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सीबीआयकडून सचिन अंदुरे आणि हिंदू जनगागृती समितीचे सदस्य वीरेंद्र तावडे यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.