भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या आज महापरिनिर्वाण दिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. एप्रिल 2023 पर्यंत इंदूमिल (Indu Mill) येथील बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारकाचे काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन केले.
धनंजय मुंडे यांनी आजच्या या महान दिनी दादरच्या चैत्यभूमीवर लाखो अनुयायी अभिवादन करण्यास येतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे अनुयायांनी सरकारला साथ देऊन येथे न जमल्याने त्यांचे देखील कौतुक केले. धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन सर्वांचे आभार मानले आहे.हेदेखील वाचा- Mahaparinirvan Din 2020 Chaityabhoomi Live Streaming: यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरबसल्या करा Online अभिवादन; येथे अनुभवा दादर चैत्यभूमी येथील लाईव्ह सोहळा (Video)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन केले.दरवर्षी येथे लाखो अनुयायी अभिवादन करायला येत असतात,कोरोनामुळे प्राप्त परिस्थितीत राज्य शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आभार!
(1/2) pic.twitter.com/De8HFVZFTE
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 6, 2020
तसेच इंदूमिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम वेगाने सुरु असून राज्य शासन त्याकडे दैनंदिन पद्धतीने लक्ष ठेऊन आहे. एप्रिल 2023 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची शिकवण आमच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
इंदूमिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम वेगाने सुरू असून राज्य शासन त्याकडे दैनंदिन पद्धतीने लक्ष ठेऊन आहे. एप्रिल २०२३ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची शिकवण आमच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
(2/2)
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 6, 2020
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारत अनेकांना या धर्माची दीक्षा दिली. दरम्यान भारतातील अनुसूचित जाती, जमातींच्या लोकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावर सक्षम करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी भरीव कामगिरी केली आहे.